धाटावमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा : हर हर महादेव जयघोष
सिटी बेल • धाटाव • शशिकांत मोरे •
रोहा तालुक्यात धाटाव गावातील तलावाजवळ असलेल्या प्राचीन श्री शंभू महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.”हर हर महादेव,मल्लिकार्जुन महाराज कि जय”अशा जयघोषाने संबंध धाटावनगरी दुमदुमली. मंदिराला मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केल्याने सर्वत्र झगमगाट पाहायला मिळाला.दरम्यान याठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याने विधिवत महापूजेसाठी ग्रामस्थाची रेलचेल पहावयास मिळाली.
सकाळी मंदिरात विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे श्री शंभू महादेवाची पालखी सायंकाळी ४वाजता ग्रामप्रक्षिणेकरिता काढण्यात आली.या पालखी दरम्यान सांप्रदाय मंडळी हरिपाठ,भजनात दंग झाले होते तर गावातील तरुण,तरुणींनी एकाच रंगाची वेशभूषा करून पालखी सोहोळ्याला रंगत आणली.लेझीम पथक,नाशिक ढोल,खालू बाजा व डीजे या सर्वच वाद्यांनी संबंध परिसर दणाणला होता.सर्व वादयांच्या तालावर लय धरीत लहान मुले,मुली, तरुणवर्ग, महिला बेधुंदपणे नाचत होते. या ग्रामप्रदक्षिणा पालखी सोहोळ्यात सार्याची वेशभूषाच मात्र आकर्षण ठरली.गावात घरोघरी पालखीचे जल्लोषात स्वागत करून दारोदारी औक्षण करण्यात आले.तर काही ठिकाणी चिमुरड्याना पालखीवरून घेतले जात होते.
माघ महिन्यात होणाऱ्या या महाशिवरात्रीच्या पालखीचे दर्शन गावातील सर्वच जेष्ठ नागरिक, महिलांनी घेतले. पुष्पहार,नारळ, पेढयांचा प्रसाद घराघरातून देवाला दिला जात होता. नेते भाई पाशिलकर, विजय.मोरे यांसह कुटुंबीयांनी सुद्धा पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.
हा संपूर्ण सोहोळा उत्तम रित्या पार पाडण्यासाठी वरची आळी सर्व कमिटी त्याच प्रमाणे किशोर रटाटे,गणेश म्हस्कर,संतोष रटाटे,अनंता म्हस्कर,दिलीप धोंडगे यांसह सहकारी वर्ग,सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
Be First to Comment