सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
गेल्या काही दिवसात १० वी बोर्डाचे निकाल जाहिर झाले असून पुन्हा एकदा कोकण अव्वलस्थानी येउन आपली परंपरा अबाधित ठेवण्यात यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले. नागोठणे विभागातील शाळांचे निकाल समाधान कारक लागल्याने रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या नेतूत्वाखाली त्याच प्रमाणे नागोठणे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक व उपसरपंच सुरेश जैन व युवसेना जिल्हा अधिकारी सुधीर ढाणे यांच्या मार्गदर्शना खाली युवासेना नागोठणे यांच्या तर्फे नागोठणे विभागातील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. यावेळी युवासेना नागोठणे उपविभाग अधिकारी कु.अमोल ताडकर, नागोठणे विभाग चिटणीस कु.प्रणव रावकर, नागोठणे शहर शाखा अधिकारी कु.दिनेश वादळ , नागोठणे शहर चिटणीस प्रमोद नागोठणेकर, युवासैनिक कु.शैलेश चव्हाण उपस्थित होते.






Be First to Comment