सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
हभप एकनाथ महाराज पाल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शना खाली श्री हनुमान मंदिर विश्वस्त व ग्रामस्थ मंडळ कंठवली च्या वतीने भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 17 /2/2022 रोजी पहाटे साडे चार ते साडे सहा वाजता काकड आरती सकाळी 7 वाजता सदगुरू गोविंद बाबा वहालकर , हभप एकनाथ महाराज पाटील यांच्या हस्ते मंगल कलश पूजन, अंबाजी सदाशिव पाटील , लक्ष्मण जनार्दन पाटील , रघुनाथ बुधाजी पाटील, हरिदास माया पाटील, काळूराम रामा पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन , नारायण जोमा पाटील ,नंदनवन पांडुरंग पाटील ,कृष्णा काशिनाथ घरत , विश्वास गजानन पाटील ,गोपाळ राघो पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर हभप जनार्दन माया पाटील भानुदास रघुनाथ पाटील,महादेव नागु पाटील यांच्या हस्ते विणा पुजन व्यासपीठ चालक सदगुरू गोविंदबाबा वहालकर, हभप गोपीनाथ महाराज ठाकूर ,हभप एकनाथ महाराज पाटील होते.
दैनंदिन कार्यक्रमात पहाटे साडे चार ते साडे सहा काकड आरती ,साडे सात ते साडे बारा व दुपारी तीन ते साडे चार वाजता ज्ञानेश्वरी पारायण ,संध्याकाळी पाच ते सहा वाजता प्रवचन या मध्ये हभप कृष्णा महाराज ठाकूर ,हभप हिराजी महाराज शिवकर , हभप विलास महाराज विलास महाराज गावंड ,राजयोगी ब्रम्ह कुमारी उज्वला दीदी यांचे प्रवचन तर सहा ते सात वाजता हरिपाठ या मध्ये हरिपाठ मंडळ दिघोडे , विंधणे, चिरनेर भोम ,कोल्ही कोपर , कंठवली यांचे हरिपाठ, दिनांक 21/2/2022 , रोजी दुपारी 4 वाजता दिंडी नगर प्रदक्षिणा व पालखी सोहळा पार पडला तर सायंकाली सात वाजता शानदार दीपोत्सव कार्यक्रम पार पडला, रात्री साडे सात ते साडे नऊ या वेळेत हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये हभप गोविंद महाराज घरत (भेंडखल ),हभप सौ सुप्रिया ताई भालेकर (वाजे किरवली),हभप गणेश महाराज फुलकंठवार(भिवंडी ),हभप पुरुषोत्तम महाराज धाटावकर(रोहा ),हभप सनकादिक महाराज (बोनकोडे )यांच्या सुश्राव्य कीर्तनाने श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले तर दिनांक 22/2/2०22 रोजी हभप भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील (आसन गाव )यांच्या काल्या च्या किर्तनाने ज्ञानेश्वरी पारायणा ची सांगता झाली.
Be First to Comment