माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा ऑइल फिल्ड असोसिएशनच्या साखळी उपोषणास पाठिंबा
सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
शाळीग्राम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ओ एन जी सी, उरण एपीयु गेट समोर ओ एन जी सी प्रशासनाच्या विरुद्ध मुबई हायकोर्ट व सुप्रीमकोर्ट यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्या कारणाने दिनाकं 15 फेब्रुवारी 2022 पासून बेमुदत साखळी उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी गुरुवार दिनाकं 24 फेब्रुवारी 2022 रोजी सद रबेमुदत साखळी उपोषणाला उपस्थित राहून शिवसेनेच्या वतीने पाठींबा जाहीर केला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश राहळकर, उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विभागप्रमुख एस के पुरो, मा सभापती भास्कर मोकल, मा उपनगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, नागाव सरपंच सी के गायकवाड, सुनील नाईक व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment