Press "Enter" to skip to content

चोखंदळ खवय्यांची क्षुधाशांती करणारे भूषण हजारे

जय मल्हार घरगुती खानावळी चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

सिटी बेल • पनवेल •

गेली सहा वर्षे चोखंदळ खवय्यांची क्षुधाशांती करणारे भूषण हजारे यांनी जय मल्हार या घरगुती खानावळी ची नवीन जागेत सुरुवात केली आहे. सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आमदार प्रशांत दादा ठाकुर यांच्या शुभ हस्ते फीत कापून जय मल्हार घरगुती खानावळी चे उद्घाटन संपन्न झाले.””हार्ट ऑफ पनवेल”म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टपाल नाका येथे श्री शनि मंदिरासमोर जय मल्हार घरगुती खानावळ खवय्यांच्या सेवेत रुजू झाली आहे.

उद्घाटन समयी आपली प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत दादा ठाकुर म्हणाले की भूषण हजारे व त्यांच्या परिवाराने सुरू केलेल्या या उपक्रमास मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. यापूर्वी देखील त्यांनी अत्यंत चविष्ट,रुचकर,खमंग आणि सुग्रास अन्नपदार्थांच्या द्वारे पनवेलमधील खवय्यांना मेजवानी दिली आहे. हल्लीच्या दिवसात नोकरी अथवा व्यवसाय यामुळे बाहेर भोजन घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही व्यावसायिक लोक याचा फायदा घेतात. परंतु त्यांच्याकडून वापरले जाणारे कृत्रिम मसाले,भेसळयुक्त रंग यांच्यामुळे आपण व्याधीग्रस्त होऊ शकतो. अर्थातच त्यामुळे बाहेर भोजन घेणाऱ्यांची घरगुती पद्धतीच्या खानावळींना पहिली पसंती असते. भूषण हजारे व शीतल हजारे हे जय मल्हार या घरगुती खानावळी द्वारे चोखंदळ ग्राहकांना, खवय्यांना खमंग व रुचकर भोजन प्रदान करतील असा विश्वास मला वाटतो.

भूषण हजारे आणि शीतल हजारे यांच्या जय मल्हार या घरगुती खानावळ मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. मटन मिसळ, कोंबडी वडे, सोडे मसाला, खिमा या डिशेस त्यांच्या खनावळीच्या आयकोनीक डिशेस म्हणून ओळखल्या जातात.तर फिश मसाला, पाया सूप आवर्जून खाल्लेच पाहिजेत इतके चविष्ट असतात.सकाळच्या सत्रात बटाटे वडा, भजी, मिसळ,मेदुवडा, इडली असे पदार्थ देखील सर्व्ह केले जाणार असल्याची माहिती प्रीत हजारे यांनी दिली.

या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत दादा ठाकुर, नगरसेवक राजू सोहनी, संजय कर्पे, यतिन पिंपळे, राजेश राणे, विद्या निजामपूरकर, निलेश बेत्ती, प्रशांत कर्पे,सचिन रणदिवे,हजारे कुटुंबीयांचे आप्तेष्ट व हितचिंतक, सुप्रसिद्ध क्रिकेट संघ नानू फुलवात चे तमाम खेळाडू व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.