मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार ; कामगारांचा दृढ निश्चय.
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
एमओयु एम्प्लाईज चे सर्वेसर्वा, डायरेक्ट एम्प्लॉईजचे नेते, प्रमुख मार्गदर्शक शालीग्राम मिश्रा यांनी उरण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फुलमाळ अर्पण करून उरण तालुक्यातील ओएनजीसी एपीयु गेट येथे चालू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली.सर्व कामगारांना पुढील वाटचालीची रुपरेखा आणि मार्गदर्शन त्यांनी केले.सर्व सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शंका निरसन करून घेतली.
ओएनजीसी प्रशासनानाने कामगारांनी केलेल्या साखळी उपोषणाची दखल घेऊन शालीग्राम मिश्रा यांना चर्चेला बोलविले. पनवेल मध्ये कामगार प्रतिनिधी सोबत चर्चा करून मिश्रा यांनी काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. परंतु या आधीच्या ओएनजीसी मॅनेजमेंटच्या फसवणुकीचा अनुभव घेतलेल्या कामगारांनी जो पर्यंत कामगारांना लिखित स्वरूपात ठोस निर्णय आणि सानूग्रह अनुदान मिळणार नाही तोपर्यंत उरण प्लांट समोरचे साखळी आंदोलन चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.
कामगार सुज्ञ आणि सकारात्मक असल्याचे दाखवण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी पनवेल ओएनजीसी कंपनी समोरचे आंदोलन समाप्त करून एक पाऊल मागे घेऊन मॅनेजमेंटच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती ऑईल फिल्ड एम्प्लाईज असोसिएशन कामगार प्रतिनिधी निरंजन लवेकर आणि सुनिल नाईक यांनी दिली आहे.
दि 15/2/2022 पासून उरण मधील ओएनजीसी कंपनी समोर कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. विविध मागण्यासाठी कामगारांचे उपोषण सुरु आहे. सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी कामगारांनी केली आहे.








Be First to Comment