Press "Enter" to skip to content

सकल मराठा समाज खांदा कॉलनी तर्फे शिवजयंती उत्सव

सिटी बेल • खांदा कॉलनी •


सकल मराठा समाज खांदा कॉलनी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२२ (वर्ष ५वे) चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी या ठिकाणी करण्यात आले होते.

यावेळी पनवेल महानगरपालिका उपायुक्त कैलास गावडे व खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिववंदना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण खांदा कॉलनी सह परिसरातील शिव प्रेमींची तुफान गर्दी त्यांचा उत्साह दाखवीत होती.

त्यानंतर लाठी काठी प्रत्यक्षित करण्यात आले. खांदाकॉलनी सह पनवेल परिसरातील शिवभक्त , सामाजिक , शैक्षणिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शिवप्रतिमेचे दर्शन घेतले. विविध तरुणांच्या शिवप्रेमी मंडळाच्या बाईक रॅली , सामाजिक , राजकीय क्षेत्रातील शिवप्रेमी ,वेषभूषा करीत लहान बाल गोपाळ व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थीती दर्शवली‌.

या वेळी सायंकाळी खांदा कॉलनीतील संत जनाई महिला भजन मंडळाचा ” हरिपाठ ” गायनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला या वेळी वारकरी संप्रदायातील लोकांनी उपस्थीती दर्शवली. नंतर पनवेल चे सुप्रसिद्ध नादस्फुर्ती ढोल ताशा पथक यांच्या शिस्तबद्ध खेळ करण्यात आला. या वेळी शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज , माँसाहेब जिजाऊ , बाल शिवराय यांच्या रूपातील वेशभूषा करीत पोवाडे गायन चा कार्यक्रम सादर केला.

शिवजयंती साजरी करत असताना आपल्या संस्कृती चे दर्शन घडवत छत्रपतींचे विचार जन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत या संकल्पनेतून रात्री शाहिरी कार्यक्रम चे आयोजन केले. या वेळी शाहीर विनोद जगदाळे यांनी आपल्या पहाडी आवाजात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.