पनवेल शहर जिल्हा काँग्रेस तर्फे काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती उत्साहात
सिटी बेल • पनवेल •
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पनवेल शहर जिल्हा काँग्रेस तर्फे” काँग्रेस भवन “येथे जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी काँग्रेस चे जेष्ठ नेते अकील अधिकारी यांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, त्यामुळे शिवराजांच्या सर्वधर्म समभावचा संदेश पनवेल काँग्रेस ने अमलात आणला याचा आनंद उपस्थिताना झाला. प्रतिमा पूजानानंतर बोलतांना ओ. बी. सी. सेलचे अध्यक्ष वैभव पाटिल म्हणाले की, आपण सर्वांनी महाराजांचे विचार अमलात आणताना महिलांना सन्मानाने वागविले पाहिजे.
त्यानंतर सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, अकील अधिकारी यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी बोलतांना जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत म्हणाले की शिवरायांनी महिलांना आदराने वागविले त्याचाच कित्ता स्वतंत्र भारतात काँग्रेस ने गिरवीला. इंदिरा गांधीसारखी महिला सारा देश चालवू शकते हे जगाला दाखवून दिले सुरुवातीला ” गुंगी गुडिया ” म्हणून हिणवीणाऱ्या अटलजीना नंतर याच सभागृहात ” दुर्गाका अवतार ” म्हणून गौरवावे लागले याची आठवण सांगून इंदिराजीप्रमाणेच आता प्रियांका गांधी यांनी “लडकी हूं, लड सकती हूं ” चा नारा दिला आहे हा आदर्श काँग्रेस च्या सर्व महिलांनी ठेवला पाहिजे असा कानमंत्र दिला.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, माजी जि. प. अध्यक्ष अनंतराव पाटील, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, अनुसूचित जाती विभागाचे कोकण को – ओर्डीनेटर सुनील सावर्डेकर, महिला आघाडी अध्यक्षा निर्मला म्हात्रे, अरविंद सावळेकर, अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्षा माया अहिरे, पनवेल शहर अध्यक्ष लतीफ शेख, आरयी ठाकूर,पूजा मोहन, राहुल जानोरकर, अकील अधिकारी, हेमराज म्हात्रे, सुधीर मोरे, वैभव पाटील, शेनॉय मॅडम, आशुतोष मोहन सुनीता आदवले ई. कार्यकर्ते उपस्थित होते.
Be First to Comment