कॉंग्रेस पक्षाच्या मजबूतीकरणासाठी कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारण्याचे जनतेला आवाहन !
सिटी बेल | पनवेल |
सध्या देशात पंतप्रधान मोदी यांचा जो मनमानी कारभार सुरू आहे, त्याला आवर घालण्यासाठी संपूर्ण देशात कॉंग्रेस पक्ष मजबूत होणे ही काळाची गरज आहे याची जाणीव ठेवून सर्वसामान्य जनतेने कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वखुशीने घ्यावे असे जाहीर आवाहन पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व कॉंग्रेस पक्षाचे योगदान याचा इतिहास पुसण्याचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलण्याचा घाट विद्यमान मोदी सरकारकडून केला जात आहे, स्वातंत्र्यानंतर पंडित जहावरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीपणामुळे गेल्या ७०/७५ वर्षात उभे राहिलेले सरकारी कंपन्यांचे केले जात असलेले खाजगीकरण – रेल्वे – एल. आय. सी – एअरपोर्ट – ई सारख्या सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण – वाढती बेरोजगारी – महिलांवर होणारे अत्याचार – देशाची आर्थिक स्थिती इ. बाबींवर आवाज उठविण्याचे काम संसदेत कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी आक्रमकपणे करीत आहेत, उत्तर प्रदेशात कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी “लडकी हॅू” लढ सकती हॅू” चा नारा देऊन महिलांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला त्याला पाठिंबा देण्यासाठी आमचे बूथ प्रतींनिधी सदस्य नोंदणीसाठी घरोघरी येतील त्यांना सहकार्य करून कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारावे व कॉंग्रेस मजबूत करून लोकशाही वाचविण्याच्या देश कार्यास हातभार लावावा असेही आवाहन आर. सी. घरत यांनी केले आहे.
दर वर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देणार / प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार अशी खोटी आश्वासने देणार्या मोदी सरकारला जाब विचारण्यासाठी व उजव्ला योजने अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर वाटपाचा इवेंट करून नंतर गॅसच्या किमती ९०० रुपयांवर नेऊन गरिबांची चेष्टा करण्यार्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच कोविड काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्य न करता पी. एम. केअर फंडाला १०६ आमदारांचा आमदार निधी देणार्या भारतीय जनता पक्षाला जाब विचारण्यासाठी सुद्धा कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन या पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
Be First to Comment