आयजीपीएल कंपनीच्या सी एस आर फंडातून १.८० कोटी रुपयांचा निधी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण
सिटी बेल | कळंबोली |
नगरसेवक सतीश पाटील यांच्या प्रयत्नातून कळंबोली वसाहतीतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणार्या सेक्टर ५ येथील उदयानाचा कायापालट करण्यात येणार आहे. नागरिकांना हवाहवासा वाटणारे नंबर एकचे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. आयजीपीएल कंपनीच्या १ ८० कोटी रुपयाच्या सीएसआर फंडातून सर्व सुविधांनी नटलेले असे उद्यान कळंबोलीकरांना मिळणार आहे. याचे लोकार्पण राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे.
शहराचे शिल्पकार सिडकोने घरांचा पहिला प्रयोग करताना सर्वांना परवडेल अशी बैठ्या घरापासून आलिशान घरे कळंबोलीमध्ये उभी केली. सर्व सुविधा देताना रहिवासीना विरंगुळा मिळावा म्हणून उद्याने विकसीत करण्यात आली. आणि उद्यानासाठी आरक्षित भूखंड ठेवण्यात आले. पण त्यांची देखभाल आणि डागडुजीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे अनेक उद्यानांची अतिशय दुरावस्था झालेली आहे. दारूचे व गर्दुल्यांचे आद्दे बनली आहेत. तर काही उद्याने नष्ट होऊन त्यांची जागा पार्किंगने घेतली आहे.
पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून सिडकोने दुर्लक्ष केले त्यामुळे सिडको वसाहती मधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पनवेल महानगरपालिकेत धगधगणारी तोफ असलेले नगरसेवक सतीश पाटील आपल्या प्रखर अभ्यासाने येथील नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नातून कळंबोली येथील सेक्टर ५ मधील उद्यान सुशोभीकरणासाठी तळोजा एम आय डी सी मधील आयजीपीएल कंपनीने १कोटी ८० हजार रुपयांचा सी एस आर फंड
सर्व सुविधांनी नटलेले असे हे उद्यान परिसरात एक नंबरचे असेल असे नगरसेवक सतीश पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले. बॅडमिंटन, स्टेनिस, क्रिकेट या खेळा बरोबर योगा, उत्तम पद्धतीचा लॉन, प्रशस्त चिल्ड्रन पार्क, वेगळ्या प्रकारचा गार्डनिंग, वॉकिंग करण्यासाठी पाथ-वे, सार्वजनिक स्वच्छतागृह असा विविध सुविधांनी नटविण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच कळंबोलीकरांच्या सेवत येणार आहे. त्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सतिश पाटील यांनी सांगितले.
Be First to Comment