गणेश चौधरी यांनी भजनांच्या माध्यमातून माजगांव येथिल माघी गणपती उत्सवाची सांगता
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
माघ महिन्यामध्ये गणपती उत्सव येत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा करण्यात आला.विशेष या उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरु होती.माजगांव येथिल असलेल्या विठोबा रखुमाई मंदिरात माघी गणपती उत्सवांची सांगता भजनांच्या माध्यमातून सांगता करण्यात आली.
सकाळी गणेश पूजन,सत्यनारायण महापुजा, गणेश पालखी सोहळा,हरिपाठ, महिला वर्गांसाठी कार्यक्रम तसेच रात्री भजन रुपी सेवा कर्जत वदप येथिल गणेश चौधरी मृदुंगमणी वादक कृणाल चौधरी यांनी उत्तम साथ देवून भजन गावून या लहान बालगायकांनी येथिल ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.त्याच बरोबर त्यांस सहकारी म्हणून रेणुका चौधरी,महेश चौधरी,ऋतुक पाटील,सानिका कर्णुक,मोहन भोईर,हनुमान गडगे नथुराम गडगे,हरीबुवा गडगे अदि यांनी सुंदर असे भजन गाऊन ग्रामस्थांची मने जिंकली.तसेच या भजनांच्या माध्यमातून सांगता करण्यात आली.
गेली सतरा वर्ष माजगांव विठोबा रखुमाई मंदिरात माघी गणपती उत्सव साजरा केला जात असतो.यामुळे दर वर्षी विविध माध्यमातून अन्न दान केले जाते यावर्षी लक्ष्मीकांत सुर्याजी पाटील,शरद पाटील यांच्या माध्यमातून महाप्रसाद देण्यात आले.या कार्यक्रमास सरपंच,उप सरपंच, सदस्य,सामाजिक,राजकीय कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ तरुण वर्गांनी मेहनत घेवून हा कार्यक्रम यशस्वी रित्या राबविण्यात आला.या त्याच बरोबर ग्रामस्थ मंडळ माजगांव यांचे सहकार्य लाभले.








Be First to Comment