सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
माघ महिन्यामध्ये गणपती उत्सव येत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो.गेल्या दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे शासकीय नियमांचे बंधन आल्याने नियम पाळून भक्तगण माघी गणेशोत्सव साजरा करतात.
विशेष या उत्सवाच्या निमित्ताने मोहोपाडा येथील हरेश विजय म्हस्कर व सुबोध विजय म्हस्कर यांच्या निवासस्थानी दीड दिवसांच्या श्रीगणेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी गणेश पूजन , आरती व, हरिपाठ,दिड दिवस सर्वांसाठी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले.माघी गणेश उत्सवानिमित्त हरेश म्हस्कर यांच्या निवासस्थानी सावळे येथील सुप्रसिध्द गायिका कुमारी माळीने उत्तम असे भजन गावून त्याच बरोबर मृदृंगमणी नितिन माळी यांनी उत्तम साथ देवून भजन गावून ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.
दरम्यान मोहोपाडा गाव ते मोहोपाडा तलाव अशी श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.आपल्या दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोहोपाडा ग्रामस्थ उपस्थित होते.विसर्जंन मिरवणूक तलावावर येताच श्री गणेश भक्तांच्या डोळ्यातून अश्रु अनावर झाल्याचे चित्र दिसून आले.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आरोळ्यांनी भक्तिभावाने माघी गणेशोत्सवाच्या श्री गणेशाला निरोप देण्यात आला.
Be First to Comment