महडच्या अष्टविनायक मंदिरात गणेश जन्मोत्सव साजरा
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात येतो.विशेष करून महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायक मंदिरात भाविक भक्ताची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यांने या वरद विनायाकाचे दर्शन घेण्यासाठी या ठीकाणी असंख्य भक्त गण आले होते.मुंबई -पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायका पैकी महड गावातील वरद विनायक येथे गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने महड येथे किर्तनांचे आयोजन करण्यात आले आपल्या सुमधुर वाणीमधून हर्षद महाराज जोगळेकर यांनी सुंदर असे माघी गणपत्ती उत्सव यावरती आपले विचार किर्तनांच्या माध्यमातून सांगितले.
यावेळी भव्य दिव्य अशी रांगोळी ( वरद विनायक फुल रांगोळी मंडळ )यांनी साकारली रांगोळी चे सुंदर असे दृश भक्तगणांनाचे मन आकर्षिले जात होते .आणि आपल्या जवल असलेल्या मोबाइल.मध्ये टिपण्याचा प्रयत्न करीत होते. अशीच सुंदर रांगोळी रवि आचार्य नेरळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश देशमुख – माणकीवली, सचिन पाटील – कलोते, तुळशिराम ठोंबरे – टेंभरी, साक्षी देशमुख,कविता देशमुख, वंदना देशमुख,लीना पाटील,तसेच व्यवस्थापक अतुल तट्टू ,आदी कलाकारांनी साकारली असल्याने सर्व कलाकारांचे कौतुक होत आहे.रांगोळी काढण्यासाठी १०० किलो कणीचा वापर करण्यात आला.तसेच रांगोळी साठी अर्थ सहाय्य यशवंत सिन्हा चुडासमा अहमदाबाद ,गुजरात यांनी केले. तसेच ह्या रांगोळी साठी अठ्ठेचाळीस तास एवढा कालावधी लागला.कणी, साबुदाणे,काळे तिळ,यांचा वापर करण्यात आला.त्याच बरोबर विविध रंग वापरण्यात आले. यामध्ये तांबडा,नारंगी,पिवळा, हिरवा,निळा,पांढरा,जांभळा अदि रंगाचा वापर करण्यात आला.या रांगोळी मध्ये या मध्ये झाडे जगवा त्यांना नष्ठ करु नका असा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला.
त्याच समवेत दर्शन घेण्यासाठी येत असलेल्या भक्तांना वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पिण्याची पाण्याची सोय अनेक ठिकाणी करण्यात आली होती.
Be First to Comment