सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
माजी आमदार मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत जेएनपीटी मधील कंत्राटी कामगारांसाठी नवीन वेतन कराराला मान्यता मिळाली. सदर वेतन करारासाठी न्हावा शेवा बंदर कामगार संघटना अंतर्गतने पुढाकार घेऊन सतत पाठपुरावा केला होता. हा वेतन करार 01 एप्रिल 2020 पासून लागू असेल. यामुळे सर्व कामगारांना भरघोस पगारवाढ व मागील थकबाकी मिळेल. तसेच 8.33 इतक्या बोनसला प्रथमच मान्यता मिळाली आहे.
या वेतन कराराच्या वेळी कामगार विश्वस्त श्री भूषण पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, न्हावा शेवा बंदर कामगार संघटना अंतर्गतचे अध्यक्ष श्री दिनेश घरत, सचिव प्रशांत भगत, किशोर पाटील व कंत्राटी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. चांगल्या कराराला मान्यता दिल्याने जेएनपीटीचे वरिष्ठ व्यवस्थापक ढवळे यांचा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेतन करारामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.








Be First to Comment