Press "Enter" to skip to content

9 लाख करून घेतले माफ

युवासेनेच्या दणक्यानंतर मुजोर हॉस्पिटलमधून नवजात बालकाला मिळाला डिस्चार्ज

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | 

युवासेनेच्या दणक्यानंतरखारघरमधील एका हॉस्पिटलमधूननवजात बालकाला डिस्चार्ज मिळवून देण्यात आला आहे. तसेच त्याच्या उपचारासाठी आलेल्या बिलातील9 लाखसुद्धा हॉस्पिटल प्रशासनाकडून माफ करण्यात आले आहेत.          

खारघरमधील मदरहूड हॉस्पिटलमध्ये ५ महिन्यांत जन्मलेले अकाली बाळाचे उपचार गेले चार महिने चालू होते. अकाली (प्रिमॅच्युअर बेबी) बाळ जन्मल्यामुळे इलाज खूप गुंतागुंतीचा होता. रूग्णालयात दाखल करत असताना हॉस्पिटलकडून साधारणपणे १५ लाख खर्च अपेक्षित सांगितला होता.

कालांतराने उपचार चालू असताना डॉक्टरांच्या मतानुसार गुंतागुंत वाढल्याने सुमारे २७ लाखाच्या जवळपास बिल बाळाच्या आई वडिलांना झाल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. त्यापैकी रोखरक्कम व इतर काही रक्कम कर्ज काढून १७ लाख रूपये टप्प्या टप्प्याने हॉस्पिटलमध्ये भरले गेले. उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुलाचे वडील सक्षम नसल्याने मागील २० दिवसांपासुन हॉस्पिटलमधून पैसे भरले नाहीत तर डिस्चार्ज मिळणार नाही असे सांगून बाळाची अडवणुक केली होती.

सदर कुटूंबिय हे मूळचे कर्जत येथील रहिवासी असून ते मुस्लीम कुटुंबीयातील वासिम जालानी हे आहेत. या दाम्पत्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्याकडे तक्रार केली व मदत मागितली असता खासदार बारणे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता दिल्लीला असल्याने सदर प्रकरण हाताळण्याची सूचना खारघर येथील युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांना दिली.

तातडीने अवचित राऊत यांनी शिवसेना विभागसंघटक रामचंद्र देवरे, विभागप्रमुख उत्तम मोर्बेकर, युवासेना उपतालुका अधिकारी अनिकेत पाटील, युवासैनिक संकेत पाटील, विजय रोकडे, प्रकाश राजपुत, यांना सोबत घेऊन मदर हूड हॉस्पिटलला भेट देत तेथील प्रशासन व उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून खरी परिस्थिती त्यांच्या समोर मांडली व उर्वरित बिल माफ करण्याची विनंती केली. त्यानुसार यशस्वी मध्यस्थी करत उर्वरित असलेल्या बिलापैकी 9 लाख रूपयांचे बिल हॉस्पिटल प्रशासनाकडून कमी करून घेऊन डिस्चार्ज मिळवून दिला.

यावेळी बाळाच्या पालकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे सह शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांच्या मातोश्री या आजारपणामुळे मुंबई येथील रूग्णालयात गेल्या 8 दिवसांपासून उपचारार्थ दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अवचित राऊत हे तिथेच आईच्या सेवेसाठी होते. परंतु जेव्हा या नवजात बालकाची माहिती त्यांना मिळताच ते तातडीने खारघर येथे येऊन त्यांनी यशस्वीपणे मध्यस्थी करून आईच्या सेवेसाठी पुन्हा ते मुंबई येथे रवाना झाले. यातूनच शिवसैनिक हा काळवेळ न बघता सदैव लोकांच्या सेवेसाठी तैनात असतो हे दिसून आले.            

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.