दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रायगड शाखेच्या श्रामनेर व बौद्धाचार्य धम्मप्रशिक्षण शिबिराची सांगता
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ट्रस्टी व राष्ट्रीय महासचिव म्हणून मान्यता दिलेल्या विश्वनाथ मोखळे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा शाखेने शाखा पनवेल, खालापूर, खोपोली शहर यांना सोबत घेऊन श्रामणेर बौद्धाचार्य शिबीर रसायनीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न झाले.
संस्थेच्या उददे्शानुसार या शिबिरातून सुसंस्कृत माणूस बनवून त्यागी, निष्ठावंत, समाजाला विकासापरत घेऊन जाणाऱ्या व्यक्ती घडविणे हे ध्येय घेऊन गेली २२ वर्ष हे शिबीर राबवित असल्याचे काशिनाथ कांबळे यांनी सांगितले.
यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष काशिनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचा समारोपवेळी संस्थेचे ट्रस्टी व महासचिव आद विश्वनाथ मोखळे , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र मोरे, उपाध्यक्षा प्रतिभाताई मोरे, कोषाध्यक्ष स जा कवडे, पुणे जिल्हा महासचिव जगताप, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनिल बनसोडे, भिमश्क्ती पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड बौद्धाचार्य हिरामण जोशी, उद्योजक प्रविणशेठ गायकवाड, जिल्हा पदाधिकारी महासचिव संजय जाधव, कोषाध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, वसंत कांबळे, रमेश कांबळे, सोपान भोसले, के के निकाळजे, उद्योजक प्रविणशेठ कांबळे, मोरे गुरूजी, हरिश्चंद्र गायकवाड, डी के बाबरे, दिलीप मणेर, बी. एच. गायकवाड, रमेश गायकवाड, खालापूर तालुका कोषाध्यक्ष रमेश मोरे, उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर खोपोली शहर अध्यक्ष आनंद सोनावणे, अनंत फाले,अनंत गायकवाड, गणेश केदारी,सुरेश गायकवाड, अलिबाग तालुका कोषाध्यक्ष जगन्नाथ मोरे, पनवेल तालुका कोषाध्यक्ष सुरेश गायकवाड, चंद्रसेन कांबळे, समता सैनिक दलाचे कृष्णा जाधव, वृषाल गायकवाड,रत्नमाला जाधव, मिठबावकरताई, कर्जत तालुक्यातील मधुकर शिंदें, किसन रोकडे, राजेश ढोले, किरण खंडागळे,रवींद्र जाधव,मारुती गायकवाड,दिपक जाधव,दिपचंद गायकवाड, संतोष रोकडे,रसायनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हस्कर, उद्योजक राम गाताडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल तालुका अध्यक्ष सुनील वाघपंजे, महासचिव राहुल गायकवाड यांनी केले.
या शिबीरात ३५ शिबिरार्थींचा संघ संघनायक पु भन्ते महेंद्र बोधी यांनी १० दिवस मार्गदर्शन केले. शिबीरास सर्व धम्मदान देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले डॉ नितीन गाढे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले अलिबाग तालुका अध्यक्ष अरविंद वाघमारे, सरीताताई भिमराव बैसाणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले तसेच दान दाते, श्रमदान दाते यानाही सन्मानित करण्यात आले या व्यतिरिक्त शिबीर काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन रसायनी व परीसर स्वच्छता अभियान राबविले या अभियाना त रसायनी मधील कार्यकर्ते तसेच प्रविणशेठ गायकवाड आणि परीवार तसेच पनवेल तालुका पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.
Be First to Comment