रसायनीतील कराटे प्रशिक्षक सचिन माळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
डायनामिक युथ स्पोर्ट्स अॅकॅडमी इंडिया यांच्यावतीने अभिमान महाराष्ट्राचा पुरस्कार वितरण सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यामध्ये तायक्वांदो या क्रिडा प्रकारात गेली वीसपेक्षा जास्त वर्षे प्रशिक्षक म्हणून काम पाहणा-या रसायनीतील तुराडे येथील सचिन माळी
यांना सर्वोत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अभिमान महाराष्ट्राचा -जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, शशिकांत केरकर, निलेश शेलार, ऋतुजा बागवे, यामिनी म्हामुणकर, रोहन कदम,मनीष गव्दिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान तुराडे रसायनी येथील सचिन माळी हा गेली 25 वर्षे कराटे क्षेत्रात कार्यरत आहे. परिसरातील युवकांना तायक्वांदो कराटेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम सचिन माळी करीत आहेत.युवकांनी स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण घेणे हि काळाची गरज असल्याचे सचिन माळी यांनी सांगितले.
Be First to Comment