करंजाडे येथे सर्वधर्मीय हळदीकुंकू समारंभ पारंपारिक पद्धतीने संपन्न
सिटी बेल| पनवेल | संजय कदम |
दुधेविटेवरी कॉम्पेक्स सेक्टर 3 ए, कंरजाडे येथील महिलांचा हळदीकुंकू समारंभ अतिशय दणक्यात साजरा झाला. सोसायटी मधील सर्व धर्मीय 60 महिलांनी मराठमोळ्या पांरपारिक वेषभूषेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सांय.7 वाजता गणरायांचे स्तवन आणि गुरू वंदना याने झाली. मकर संक्रांत कशी व का साजरा केली जाते ?, तिळाचे लाडू काय टाकून, का बनवले जातात व का खाल्ले जातात ? तसेच काळी वस्त्रे का परिधान केली जातात ? ही महत्त्वाची माहीती एका आगळ्यावेगळ्या खेळा सोबत देण्यात आली.
महिलांनी एकमेकीस हळदीकुंकू आणि वाण दिले व सोबत उखाणे घतले. त्यानंतर सर्व महिलांनी मराठी, कोळी, हिंदी क्लासिकल , राजस्थानी, व वेस्टन गाण्यावर जल्लोष केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Be First to Comment