दुकानांना मराठी नामफलक लावण्याचे निर्देश द्यावेत : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची मागणी
सिटी बेल | पनवेल | प्रतींनिधी |
दुकानांना मराठी नामफलक लावण्याबाबतच्या महाराष्ट्र शासन निर्णयाची अमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या कडे लेखी निवेदनद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात मराठी नामफलक दुकानावर (आस्थापनेवर) लावणेबाबत शासन नियमानुसार सक्ती करण्यात आलेली आहे. वास्तविक पहाता मराठी नामफलक लावणे बाबत यापूर्वी शासनाचा प्रस्ताव मंजूर होवून, त्याची अमंलबजावणी कमी अधिक प्रमाणांत झाल्याचे दिसून येत आहे. परंतु मुंबई, नवी मुंबई, पनवेल ही भारतातील बहुभाषीक मायानगरी असल्यामुळे जगातील आठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत
महाराष्ट्र राज्यातील मराठी नामफलक लावणे बाबत मुंबई उच्च न्यायालयात काही याचिका प्रलंबित असताना सुध्दा महाराष्ट्र राज्याच्या हितार्थ राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारने सक्षम कायदा अंमलात आणला. अशावेळी मराठी पाट्यांबाबत कायदेशीर कारवाई महानगरपालिका यांनी त्यांच्या अधिका-यांच्या मार्फत युध्दपातळीवर करण्यांचे आहे. परंतु सध्या सरकारी अधिकारी अन्य कामात गुंतलेले असल्यामुळे, या विषयावर पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शासकीय अधिका-यांवर असून हया योजनेचा अंमल कसा करता येईल हे पहाणे उचित ठरणार असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
रायगड जिल्हयातील संपूर्ण दुकानावरील मराठी नामफलक लावणे बाबतचे शासकीय धोरण राबविण्यांत यावे अन्यथा धोरण राबविण्यांबाबत संबंधित शासकीय अधिकारी असमर्थ असतील तर, त्या अधिकार्यांथच्या विरूध्द शासकीय नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच शासकीय धोरण राबविण्यांत अधिकारी वर्ग चालढकल करणार असतील तर, शिवसेना संघटनेला महाराष्ट्राचे अस्तित्व व अस्मिता रहावी म्हणून शासकीय धोरणांची अमंलबजावणी करणे साठी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. त्या अंतर्गत होणार्या परिणामास आपण व आपले प्रशासन जवाबदार राहील असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
याबाबद शिवसेना महानगर समन्वयक गुरूवाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, शहर प्रमुख खारघर प्रकाश गायकवाड, उपशहर संघटक शंकर सोनुले, माजी उपशहर प्रमुख रविंद्र धाडवे आदी पदाधिकारीे यांनी पनवेल आयुक्तांना निवेदन दिले.
Be First to Comment