काँग्रेसच्या सदस्य नोंदणीची मुख्य नोंदणीकर्त्यांच्या प्रशिक्षणाने सुरुवात
सिटी बेल | पनवेल |
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने काँग्रेस सदस्य नोंदणी प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मंजुरी दिलेल्या मुख्य नोंदणी कर्त्यांच्या प्रशिक्षणाने जिल्हाअध्यक्ष आर. सी. घरत यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी मुख्य नोंदणीकरत्ये म्हणून 13 जणांची निवड करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत यांनी प्रास्ताविक करताना या नोंदणी करण्याने काय – काय फायदे होतील यावर मार्गदर्शन केले, त्यानंतर अभिजित पाटील यांनी माहितीची कॅसेट दाखवीत तर डॉक्टर धनंजय क्षीरसागर यांनी टप्प्या टप्प्याने नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन उपस्थिताना केले.

या मुख्य नोंदणीकर्त्यांनी प्रति बूथ दोन नोंदणी कर्त्यांची नियुक्ती 6 फेब्रुवारी पर्यंत करावयाची आहेत याची सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, कॅप्टन कलावत, ज्येष्ठ नेते अनंतराव पाटील सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, डॉक्टर क्षीरसागर, अभिजित पाटील, सौ. निर्मला म्हात्रे, हेमराज म्हात्रे, मोहन गायकवाड, माया अहिरे, अनुपमा चुढा, लतीफ शेख, मर्फी म्हसकर, तुषार पवार, सागर पगारे, जयदास पाटील, किरण तळेकर, जालन्दर लोखंडे, भारती जळगावकर, सुरेश पाटील आणि ऍडव्होकेट अरुण कुंभार ई. पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment