लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताबाने गौरविण्यात यावे
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
जागतिक कीर्तीचे साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त त्यांना भारतरत्न किताबाने गौरविण्यात यावे अशी मागणी ना. धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री ( महाराष्ट्र राज्य ) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तुषार तानाजी कांबळे अध्यक्ष – कोकण प्रदेश ( आरपीआय ) मातंग आघाडी तथा संस्थापक अध्यक्ष – तथ्य योद्धा आणि संतोष चौधरी राष्ट्रीय अध्यक्ष पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली यांनी या मागणीचे निवेदन मुंबई मंत्रालय येथे धनंजय मुंडे यांना सुपूर्द केले.
दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी देखील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताबाने गौरवावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार होईल असा आशावाद बहुजन समाजात निर्माण झाला आहे.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने जागतिक स्थरावर प्रभाव पाडला आहे. फकिरा ही प्रचंड गाजलेली कादंबरी ठरली. समाजप्रबोधन व परिवर्तन घडवून आणणेकामी त्यांचे विचार देशाला प्रेरक ठरतात, असे कांबळे म्हणाले. यावेळी ना.मुंडे यांच्यासमवेत अनेक सामाजिक मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली याप्रसंगी तथ्य योद्धा पदाधिकारी देखील उपस्थित होते .






Be First to Comment