गार्डन हॉटेल येथे “कंटेनर टॉयलेट” उभारणे कामास सुरुवात
सिटी बेल | पनवेल |
विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेविका डॉ. सौ सुरेखा मोहोकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्र. क्र.18 मधील गार्डन हॉटेल येथील न्यू मॉडर्न स्वीट समोर कंटेनर टॉयलेट उभारण्याचे कामास सुरुवात झाली आहे.
नगरसेविका डॉ. सौ.सुरेखा मोहोकर या नेहमीच जनतेला सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता तत्पर असतात. प्र. क्र.18 हे महानगर पालिकेचे प्रवेशद्वार आहे गार्डन हॉटेल येथून हजारो नागरिक पनवेल मध्ये प्रवेश करतात.स्वामी नित्यानंद मार्ग येथूनच सुरुवात होतो व सदरच्या रस्त्यालगत अनेक मोठी रुग्णालये,तालुका पोलिसस्टेशन,न्यायालय,नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय,पनवेल पालिका मुख्यालय स्थित आहेत.येणाऱ्या नागरिकांची विशेषत महिला व ज्येष्ठ नागरीक यांची पूर्ण रस्त्यावर शौचालय नसल्यामुळे गैरसोय होत होती.
होणारी गैरसोय कार्यतत्पर नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनीज्ञदि.२१/०७/२०१७,,२६/०७/२०१८,१५/१२/२०२० व ०८/०६/२०२१ रोजी मा.आयुक्त यांना शौचालय उभे करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले व त्याचा सातत्याने पाठपुरावा करत राहिल्या.या करीता मा.आयुक्त गणेश देशमुख सर, मा. उपायुक्त पवार साहेब, मा.विधाते साहेब, कोकरे ,शैलेश गायकवाड साहेब,गडकरी, सापने साहेब यांची सतत भेट घेऊन पाठपुरावा चालूच ठेवला.सरतेशेवटी दि.२७/१२/२०२१ रोजी सायं.५वाजता मा.पवार साहेब व मा.विधाते साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छ्ता निरीक्षक शैलेश गायकवाड व चिन्मय सापने यांच्यासमवेत मा.नगरसेविका डॉ.सौ.सुरेखा मोहोकर यांनी जागेची पाहणी केली व गार्डन हॉटेल येथील न्यू मॉडर्न स्वीट समोर कंटेनर टॉयलेट उभे करण्याकरीता जागा निश्र्चित करण्यात आली. व दरवाजा कोणत्या दिशेस हवा, मल वाहिनी,पाणी जोडणी,शौचालय स्वच्छ्ता याविषयी चर्चा केली.
स्वच्छ्ता विभागाकडून साफसफाई करून सदरच्या ठिकाणी काँक्रिट करून कामास सुरुवात झाली आहे. “अविश्रांत मेहनत व प्रामाणिकपणे” सतत पाठपुरावा व जनतेच्या सहकार्यामुळे आता गार्डन हॉटेल येथे कंटेनर टॉयलेट उभारणे कामास प्रारंभ झाला आहे. याकरीता मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,जिल्हा चिटणीस गणेश कडू यांचे मार्गदर्शन व सर्व सहकारी यांचे सहकार्य मिळाले.टॉयलेट उभारणी करीता प्रशासनाने केलेले सहकार्य याबद्दल नगरसेविका डॉ सुरेखा मोहोकर यांनी आभार मानले.
नागरीकांनी कार्यतत्पर नगरसेविका डॉ सौ सुरेखा विलास मोहोकार यांचे अभिनंदन करून आभार मानले.लवकरच विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचे लोकार्पण करण्यात येऊन शौचालय नागरिकांकरीता खुले करण्यास येईल असे मा.नगरसेविका डॉ सौ सुरेखा मोहोकर यांनी नागरीकांशी संवांद साधताना सांगितले आहे.
Be First to Comment