HIL रसायनी मधील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व
सिटी बेल | पनवेल |
केंद्रसरकारचा उपक्रम असलेले HIL (हिल) रसायनी या कंपनीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील NMGKS संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.
केंद्रसरकारच्या उदासीन धोरणामुळे तसेच मालक धार्जीन्या धोरणामुळे सार्वजनिक उपक्रमांच्या जमिनी अदानी – अंबानी यांच्या घशात घालण्यासाठी फायद्यातील उपक्रमांकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सहा – सहा महिने या कामगारांची पगारं दिली जात नाहीत. पिकती जमीन या प्रकल्पासाठी दिल्यामुळे उत्पन्नाचे साधनही उरलेले नाही त्यामुळे स्थानिक कामगार मेताकुटीस आले आहेत. आपले परिवार सांभाळता यावेत यासाठी रोजगार टिकला पाहिजे या आशेने कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे.

संघटनेच्या नामफलक अनावरण प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, खा. ता. कॉं. क. अध्यक्ष, नाना म्हात्रे, कार्याध्यक्ष कृष्णा पारींगे, रा. जि. कॉं. क. उपाध्यक्ष अशोक मुंढे, म. प्र. यु. कॉं. सचिव निखील डवळे, प्रशांत खाने, संदेश डवळे, दिपक ठाकूर, योगेश रसाळ, देवेंद्र पाटील, चेतन खाने, सागर सुखदरे, HIL चे कामगार सुमित सोनावणे, तुषार पवार, प्रितम कांबळे, किरण ठोंबरे, प्रसाद पाटील, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.








Be First to Comment