Press "Enter" to skip to content

श्रीवर्धनची कासारकोंड, कोंडीवली, गुलधे, शिरवाने, हुनुरवेली गाव पुन्हा प्रकाशमान


सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / रायगड #

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात बाधित झालेले श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचे अतोनात नुकसान झाले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून येथील अनेक गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला. श्रीवर्धन येथील शेवटचे गाव म्हणजे कासरकोंड, कोंडीवली, गुलधे, शिरवाने, हुनुरवेली गावांचा वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता यांनी येथील गावांमध्ये वेळोवेळी भेटी देऊन कामाची पाहणी केली, तसेच या डोंगर दरीतील कठिण कामात येणाऱ्या अडचणीचे निरसन केले .

बोर्ली फीडरचे 44 उच्चदाब खांब, 5 डी.टी.सी उभे करणे खूप कठीण होते. कोंडीवली गावाजवळ दलदलीच्या ठिकाण तसेच कासारकाेंड सारख्या गावाची 22 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी डोंगर माथ्यावर दुर्गम भागातून जात असल्याने नवीन विद्युत खांब वाहतुक करणे व वाकलेले विद्युत खांब सरळ करणे अतिशय कठीण होते. या खांब्यांची पुन्हा उभारणी करून या गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील व गोरेगावचे कार्यकारी अभियंता श्री. अप्पासाहेब खांडेकर यांनी या कामासाठी मे. जे आर इलेकट्रीकल्स व मे.मातोश्री इलेकट्रीकल्स या एजेंसींना नेमून सर्व कामाचे नियोजन केले.

अधीक्षक अभियंता श्री.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता श्री. म्हस्के यांनी बोर्ली फीडरचे काम हाती घेतले व प्रत्येक गावात जाऊन पोलचे निरीक्षण केले व दिवसरात्र काम करून डोंगरदऱ्यातील सर्व गावांचे कठीण काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. म्हस्के सोबत सहाय्यक अभियंता, श्री.रोशन शिंगटे, सेवा निवृत्त सहाय्यक अभियंता श्री. तुळजापूरकर, लाईन स्टाफ श्री.सूर्यकांत चांदोरकर, श्री.विशाल खंडारे यांनी खूप मेहनत घेतली.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. म्हस्के यांनी बोर्ली फिडर वरील गावे प्रकाशमान करण्याकरीता विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.