Press "Enter" to skip to content

अभयारण्यातील पक्षांना जगणे झाले कठीण

ध्वनी प्रदूषणामुळे गुदमरतोय कर्नाळा अभयारण्यातील पक्षांचा जीव

सिटी बेल | कर्नाळा |

ध्वनी प्रदूषणामुळे  पक्षांना होणार त्रास  वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत.  जेव्हा कुठल्या आवाजाची तीव्रता त्रासदायक होते तेव्हाच त्याला गोंगाट (छेळीश) म्हणतात. अनेक मानवनिर्मित यंत्रांद्वारे हा त्रासदायक आवाज निर्माण होतो. कर्नाळा अभयारण्यातील पक्षांचा जीव  कर्नाळा  भागात असलेल्या रिसॉर्ट आणि फेब्रिकेशनच्या कामामुळे गुदमरोय या मुळे अभयारण्यातील अनेक पक्षांना त्यांचे वन्य जीवन जगणे कठीण झाले असून ते अन्य ठिकाणी स्थलांतरित होताना दिसतात.

कर्नाळा किल्ल्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत  चिंचवनच्या हद्दीत सर्वे नंबर 51/02 मध्ये जशन फार्म रिसॉर्ट आहे या रिसॉर्ट मध्ये मोठं मोठे सोहळे डी.जे. पार्ट्या होत असून पहाटेपर्यंत येथे धांगडधिंगा सुरु असतो. कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम सुरु असते त्याचा रात्रीच्या निरव शांततेत आवाज संपूर्ण कर्नाळा अभयारण्यात घुमत असल्याने येथील पक्ष्यांवर सुद्धा परिणाम होतात.  त्याच प्रमाणे सर्वे नंबर 40/1 मध्ये डी.एस.इंजिनीयरिंग वर्क्स कंटेनर, ग्लोबल कंटेनर टर्मिनल यामध्ये  कंटेनर रिपेरिंग काम अहोरात्र सुरु असते या आवाजामुळे  देखील  येथील पक्षांना त्रास होत आहे या कंटेनर यार्डच्या कामामुळे तर आवाजासहित हवेत लोखंडी कण पसरत असल्याने अनेक पक्षांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे पक्षी प्रेमींकडून बोलले जात आहेत. या कंटेनर यार्डचे काम अहोरात्र सुरु असल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना रात्री मोठ्या आवाजाचा त्रास होत असून अनेकांनी शासनाकडे तक्रार केली आहेत. मात्र या कंटेनर यार्ड,  जशन फार्म च्या मालकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने यांच्यावर कारवाई होत नसल्याचे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे .   

अनेक प्रजातीचे पक्षी त्यांच्या अधिवासात मानवी वर्दळ वाढली अथवा ध्वनी प्रदूषण वाढले, तर ते प्रदेशच सोडून जातात. अर्थात ही समस्या सर्वत्र उद्भवली तर अशा पक्ष्यांची संख्या घटत जाऊन त्यांचे अस्तित्व संकटात येते.  तणावामुळे त्यांच्या प्रजनन शक्ती वर विपरित परिणाम होतो.अनेक प्रजातीचे पक्षी हे फुलाचे परागीभवन तसेच बिजप्रसार घडवून आणत असतात. अशी वनस्पती वृक्षाच्या बीजप्रसारात खंड पडून त्या परिसरात विशिष्ट वनस्पतींची पुनरूज्जीवन थांबते. ध्वनी प्रदूषणाचे पक्षांवर सुद्धा परिणाम होतात हे अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले आहे.कर्नाळा येथे जशन  फार्म ला  मर्यादित डेसिबल पेक्षा अधिक मोठं मोट्या आवाजात डी.जे. लावण्याचे परवानगी कोणी दिली आहे का ? या रिसॉर्ट चे फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज परवाना आहे का ? सांडपाण्याची व्यवस्था कशी केली आहे ? घनकचर्‍याची विल्हेवाट कशी लावली जाते या घन कचर्‍यामुळे  जशन  फार्म अ‍ॅण्ड रिसॉर्ट प्रदूषण करीत आहे त्यांवर प्रशासन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई कधी करेल असे प्रश्‍न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहे . ध्वनी, वायू प्रदूषण,जलप्रदूषण करणार्‍या जशन फार्म रिसॉर्ट, डी.एस. इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यावर संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ पक्षी प्रेमींकडून होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.