कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा महाराष्ट्र वखार महामंडळातील कामगारांकडून जंगी सत्कार
सिटी बेल| पनवेल|
महाराष्ट्र वखार महामंडळातील कामगारांचा बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या पाळीच्या टाईमिंगचा प्रश्न प्रलंबित होता. कामगार रात्री १२ वाजता कामावरून सुटत होते,लवकर गेले तर पगार कपात होत होता. या सर्व गोष्टींमुळे कामगारांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता.कामगारांनी भाजपची तसेच मनसेची युनियन केली परंतु कोणतीही युनियन बदल करू शकली नाही.
शेवटी कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे मेजॉरीटीने नेतृत्व स्वीकारले व त्यांना विनंती केली असता कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपले नेतृत्व कौशल्य वापरून व्यवस्थापनाला कामगारांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या पाळीचे वेळापत्रक लावायला लावले. त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, कामगारांनी कंपनीमध्ये सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते.

यावेळी कामगारांनी पूजेसाठी उपस्थित कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे भलीमोठी श्रीकृष्णाची मूर्ती भेट देऊन जंगी स्वागत केले व कामगार क्षेत्रात महेंद्र घरत यांच्या शिवाय पर्याय नाही असे गौरवोद्गार काढले.








Be First to Comment