सिटी बेल | खालापूर | विठ्ठल ममताबादे |
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी चिंचवली शेकीन, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे श्री मांढरदेवी काळूआई पौष पौर्णिमा छबीना उत्सव 2022 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवर्य कै. मधुकर कृष्णा मांडे यांच्या प्रेरणेने सौ. सविता धोंडू जाधव यांच्या अधीपत्याखाली छबीना उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून मास्क व सॅनिटायजरचा वापर करून, सोशल फिजिकल डिस्टन्स पाळून विविध कार्यक्रम संपन्न झाले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणचा यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी संपादक संतोष मोरे, खालापूर तालुक्याचे सिनियर पी आय अनिल विभुते,माजी नगरसेविका रूपाली अमोल जाधव,मानव आधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर जाधव, ऍड. हर्षद जितेकर,खालापूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर माने,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, उपाध्यक्ष हेमंत पवार, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,सल्लागार -एड. गुरुनाथ भगत, महेश पाटील, सदस्य -संजोग पाटील, नितेश पवार, गणेश म्हात्रे, सुविध म्हात्रे, महेश म्हात्रे, शुभम ठाकूर, प्रसाद चौधरी, भरत कलवले, संतोषी जाधव, प्रमोद जाधव, वैभव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचा सन्मान केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनीष मुंडे यांनी केले.
Be First to Comment