Press "Enter" to skip to content

कसळखंड येथे महाविकास आघाडीची बाजी

कसळखंड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कसळखंड ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना,शेकाप,काॅग्रेस आय,आरपीआय महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक एकमधून गौरी संतोष शिंदे (शेकाप)आणि प्रभाग दोन मधून उमेश चंद्रकांत पाटील (शिवसेना) यांचा भरघोस मतांनी विजय झाला .

याअगोदर माजी सदस्यांनी एकाने गुरचरण जागेत घर बांधकाम केले होते.तर दुस-या ने वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केले असल्याने दोन्ही सदस्यांचे सदस्य पद रिक्त करण्यात आले होते.या रिक्त दोन जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली.याकरिता भाजपाच्या विठ्ठल सदानंद पाटील व आणखी एका उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार उमेश चंद्रकांत पाटील व गौरी संतोष शिंदे यांच्यात निवडणूक झाली.

या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारी रोजी हाती आला असून यात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार उमेश चंद्रकांत पाटील यांना 384 मते मिळून त्यांनी विठ्ठल पाटील याचा दारुण पराभव केला.तर गौरी संतोष शिंदे यांना 357 मते मिळून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत केले.या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी निवडून येताच कसलखंड, शिवाजीनगर व आष्टे ग्रामदैवतांचे आशिर्वाद घेतले.यानंतर ग्रामस्थांनी दोघा विजयी उमेदवारांचे औक्षण केले.

या विजयी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी माजी सरपंच हभप अनंता पाटील,शिवसेनेचे पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष नितीन पाटील, माजी उपसरपंच अजित पाटील, कल्पेश पाटील, गिरीश पाटील ,रेवनाथ पाटील,माजी सरपंच भगवान पाटील आदींसह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.तर विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती वसंत पांडुरंग काठावले यांनी अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.