पनवेल येथे श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थ पादुकांचे आगमन
सिटी बेल | पनवेल |
पनवेल शहरात गावदेवी पाड्यावरील स्वामी समर्थ मध – मंदिरात गेल्या वीस वर्षा पासून अक्कलकोट येथून स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन होत असून या वर्षी सुद्धा समर्थांच्या पादुकांचे पनवेल शहरात आगमन झाल्यावर मठाधिपति सुधाकर घरत यांनी पालखीचे स्वागत केल्यावर श्री स्वामी समर्थांच्या पादुका दर्शना करिता पनवेल येथील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवण्यात आल्या होत्या.
भारतासह देश विदेशात स्वामी समर्थाना मानणारा मोठा वर्ग आहे . पनवेल येथील स्वामी समर्थ मठ हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे . स्वामी समर्थ मठाचे मठाधीपती सुधाकर घरत यांच्या मार्गर्दर्शना खाली गेल्या वीस वर्षा पासून अक्कलकोट येथून येणाऱ्या स्वामी समर्थांच्या पालखीचे नियोजन करण्यात येते.या वर्षी कोव्हिडमुळे अनेक धार्मिक कार्यक्रमाववर मर्यादा आल्या असल्याने सर्व नियम पाळत स्वामी पादुका दर्शना करण्याकरिता मठात ठेवण्यात आल्या होत्या .
या वेळी भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महिला मंडळाने भजन गायली.त्याच बरोबर शेकडो स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेतला.अक्कलकोट येथून पादुकांन सोबत संजय कुलकर्णी गुरुजी , शावरेप्पा मानकोजी, मल्लिकअर्जुन गवळी ,बलभीम पवार आणि संतोष भोसले आणि इतर सेवेकरी या वेळी उपस्थित होते.
Be First to Comment