Press "Enter" to skip to content

घाटकोपर येथील महानगरपालिकेच्या स्वछतादूतांना मोफत सॅनिटायझरचे वाटप

सिटी बेल | मुंबई |

कोरोना काळात नागरिकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या घाटकोपर येथील मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता दूतांना घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलतर्फे मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

मुंबईकरांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून हे स्वछतादूत अहोरात्र झटत असतात. नियमित कचरा उचलणे , सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करणे , कचऱ्याच्या ठिकाणी औषध फवारणी मारणे अशी अनेक कामे हे स्वच्छतादुत करीत असतात म्हणूच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे व त्यासाठीच झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलने पुढाकार घेतला असून घाटकोपर येथें एन वार्ड मधेही सफाई कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप केले.

याविषयी अधिक माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिझनेस हेड आशिष शर्मा म्हणाले, ” कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत खाजगी व सरकारी आस्थापने यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असल्यास मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमित केला पाहिजे म्ह्णूच आम्ही ५० लिटर सॅनिटायझर या स्वछतादूतांना उपलब्ध करून दिले आहे. यापुढे गरज लागल्यास आम्ही अजून सॅनिटायझर उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही लवकरच या स्वच्छतादूतांची आरोग्य तपासणी करणार असून गेल्या महिन्यात आम्ही १२० महिला सफाई कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी केली होती. “

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.