अधिकृत परवानाधारक हमालाची संख्या पनवेल रेल्वे स्टेशन वर वाढवण्याची अभिजीत पाटील यांची मागणी
सिटी बेल | पनवेल |
अधिकृत परवानाधारक हमालाची संख्या पनवेल रेल्वे स्टेशन वर कमी – प्रमाणात असल्याने या हमालांची संख्या वाढवण्याची मागणी अभिजीत पांडुरंग पाटील ( झेड. आर.यू.सी.सी. सदस्य, मध्य रेल्वे.) यांनी जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अभिजीत पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल रेल्वे स्टेशनवर अधिकृत परवानाधारक हमालाची संख्या खुप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे महिला वर्ग व वयोवृध्द लोकं यांना स्टेशन वर ये-जा करण्यासाठी तसेच सामानाची वहातुक करण्यासाठी त्रास होतो.
पनवेल प्रवासी संघ या विषयावर २०१७ पासुन पाठपुरावा करत आहे. परंतु या महत्वाच्या विषयावर प्रशासनाकडुन लक्ष दिले जात नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, हा विषय संबंधित रेल्वे प्रशासनाकडे तातडीने मांडला जावा, यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा प्राप्त होईल.
सदर निवेदनाची प्रत अश्विनी वैष्णव ( रेल्वे मंत्री), रावसाहेब दादाराव दानवे ( केंद्रिय राज्यमंत्री, रेल्वे मंत्रालय), दर्शना जर्दोश ( केंद्रिय राज्यमंत्री, रेल्वे मंत्रालय ), पी. के. कृष्णदास ( अध्यक्ष, भारतीय रेल्वे प्रवासी सुविधा समिती ) यांना देखील देण्यात आल्या आहेत.
Be First to Comment