सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १७ जण सापडले, २१ जणांना घरी सोडण्यात आले आहे तर २ दोघांचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह ८६९,उपचार करून बरे झालेले ६७१, उपचार घेणारे १६८, मयत ३० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
नागाव १, कोप्रोली २, डाऊर नगर १, डोंगरी ३, भवरा १, एकदंत अपार्टमेंट ५, करंजा रोड १, चिरनेर २, मुळेखंड कोळीवाडा १ असे एकूण १७ पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर उरण २, डोंगरी ७, पाणजे २, बोरी उरण १, कोप्रोली १, मोरा १,जेएनपीटी २, जासई १, नागाव १, फुंडे १, दिघोडे १, घारापुरी १ असे एकूण २१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर वाणी आळी १, फुंडे १ असे २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका बसत कोरोना पॉझिटीव्हचा आकडा उरणमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे उरणच्या जनतेने कोरोनाला घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेऊन यशस्वीपणे सामना करणे आवश्यक बनले आहे.






Be First to Comment