Press "Enter" to skip to content

पनवेल मनसेचा महावितरणला ४४० वोल्टचा झटका

विजबिलांच्या प्रती घेऊन मनसेच्या शिष्टमंडळाने दिली भिंगारी येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धडक !

सिटी बेल लाइव्ह / पनवेल –राकेश खराडे #

लॉकडाऊन कालावधीमध्ये आकारण्यात आलेल्या वाढीव वीजबिल विरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर पनवेल मनसेने नागरिकांना panvelmanase@gmail.com या ई-मेल आयडीवर विजबिल पाठविण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्यानंतर त्याच विजबिलांच्या प्रती घेऊन मनसेच्या शिष्टमंडळाने भिंगारी येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धडक दिली.

वाढीव बिलांविरोधात आक्रमक भूमिका घेत “महावितरनच्या कार्यालयात बिल लावा” आंदोलन छेडण्यात आले. त्याप्रमाणे कार्यालयात वाढीव बिलं चिटकवण्यात आली. अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत जो पर्यंत ग्राहकांचे बिलाबाबत समाधान होत नाही,तोपर्यंत बिल भरण्यासाठी तगादा लावला जाणार नाही व त्यांची विद्युत जोडणी खंडित केली जाणार नाही असे आश्वासन महावितरणचे अभियंता नानावटे यांनी दिले. तसेच प्रत्येक वितरणाच्या कार्यालयाबाहेर याबाबत सूचना फलक लावण्याचे महावितरण कडून मान्य करण्यात आले. लवकरच “वेबिनार” च्या माध्यमातून सोसायटीनिहाय बैठका घेऊन वीज बिलांच्या बाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले जाईल असे असे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे केसरीनाथ पाटील, अतुल चव्हाण, अविनाश पडवळ, योगेश चिले, संदेश भगत, पराग बालड, प्रसाद परब, रोहित दुधवडकर, शितल सिलकर, अमोल बोचरे, संदेश भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.