Press "Enter" to skip to content

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक आधुनिक तंत्रज्ञान माहिती अभ्यास वर्गाची यशस्वी सांगता

सिटी बेल | पनवेल |

प्रभाग क्र १८ मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात.याच अनुषंगाने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञान अभ्यास वर्ग ज्येष्ठ नागरिक हॉल येथे येथे आयोजित करण्यात आला होता.आजच्या आधुनिक युगात ज्येष्ठांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवी व त्यांना सुद्धा या विभागात आत्मनिर्भर होता यावे हा एकमेव उदेशय या अभ्यासवर्गाचा होता.

तीन दिवसांच्या या अभ्यासवर्गाला ज्येष्ठ नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सौ सुवर्णा तोंडुलकर यांनी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती दिली. सध्या सगळ्या ज्येष्ठांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला स्मार्टफोनचा वापर कशा प्रकारे करावा याबद्दलची माहिती देण्यात आली व त्याचे प्रात्याक्षिक ही करून घेण्यात आले.सौ सुवर्णा तोंडुलकर यांनी आपुलकी आणि न थकता आलेल्या ज्येष्ठांच्या कडून प्रात्यक्षिक करून घेतले.

या अभ्यास वर्गामुळे आपल्या शालेय वर्गातील गोष्टींना पुन्हा उजाळा मिळाला याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. नगरसेवक विक्रांत पाटील हे विकास कामांच्या बरोबर नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या साठी स्तुत्य उपक्रम राबवत असतात.यावेळी त्यांनी आम्हा ज्येष्ठांना सुद्धा सामील करून घेतले आणि नवीन युगातील तंत्रज्ञानाची माहिती करून दिली याबद्दल सर्वा ज्येष्ठ नागरीकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना आशीर्वाद दिले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सौ सुवर्णा तोंडुलकर यांचे आभार मानले.

या अभ्यासवर्गाला ज्येष्ठ नागरिक हॉल चे सचिव श्री जयवंत गुर्जर आणि हॉलच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.सौ मोहिनी विक्रांत पाटील यांनी दोन दिवस या अभ्यासवर्गाला उपस्थित राहून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने चौकशी करत सर्वांना विषय कळतोय की नाही याकडे लक्ष दिले.नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाच्या वतीने सौ वसुधा सोलंकी,सौ स्वाती पवार,सौ हर्षा ठक्कर,सौ गीता शाह,श्री निलेश वाडेकर,श्री रोहन वाजेकर,डॉ आदित्य तोंडुलकर,श्री प्रथमेश पुंडे,श्री कैलास गावडे आणि श्री विद्यासागर सोनावणे यांनी या अभ्यास वर्गात विशेष सहभाग घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.