पनवेल परिसरात कोल्ह्याचा मुक्त वावर : 8 ते 10 जण जखमी
सिटी बेल | पनवेल |संजय कदम |
पनवेल तालु्नयातील ग्रामिण भागात कोल्ह्याचा मुक्त संचार होत असून, त्याने आत्तापर्यत्त 8 ते 10 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातारण पसरले आहे.

मोसारा, मानघर, कुंडेवहाळ व पनवेल परिसरातील ग्रामिण भागातील गावांमध्ये कोल्ह्याचा मुक्त वावर होत आहे. या कोल्ह्याने आत्ता पर्यत्त जवळपास 8 ते 10 जणांना चावा घेऊन जखमी केले असून, यामध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींनी उपजिल्हा रुग्नालयात उपचारासाठी धाव घेतली आहे.

दरम्यान काही जागरुक ग्रामस्थांनी या बाबतची माहिती वन विभाग व संबधीत पोलिस ठाण्याला दिली आहे. हा एकच कोल्हा सर्वत्र फिरत आहे का कोल्ह्यांची टोळी फिरतेय वन खात्यासमोर आवाहन आहे. तरी नागरीकांनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.













Be First to Comment