Press "Enter" to skip to content

नगरसेविका चित्रलेखा  पाटील यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर धडक

पाणी पुरवठा सुरळीत सुरु न झाल्यास शेकाप हंडा मोर्चा काढेल : तालुका चिटणीस अनिल पाटील झाले आक्रमक
 

सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे- अलिबाग #

ऐन पावसाळ्यात देखील अलिबाग तालुक्यातील बहुतांशी गावांना एमआयडीसीचा पाणी पुरवठा  सुरळीतपणेकेला जात नसल्याने शेकापच्या शिष्टमंडळाने शेकाप महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली.

या शिष्टमंडळात तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, संजय पाटील,  प्रकाश पाटील,अजित माळी, अरुण पाटील, मंगेश पाटील आणि इतर ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

अलिबाग तालुक्यातील चेंढरे, कुरुळ, बेलकडे, ढवर,सहाण ते खानाव या  परिसरातील पंचायतींना गेल कंपनीचा प्लांट सुरु असे पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होत होता. मात्र कंपनी बंद झाल्यापासून सुरळीत पाणी पुरवठा केला जात नाही. हे परिसरातील सर्वच गाव पाण्यापासून वंचित आहेत. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. पी. पाटील या कडे जाणीवपूर्वक काना डोळा करत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे शेकापक्ष आक्रमक झाला. शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, संजय पाटील यांनी जाब विचारला. खडेबोल सुनावत कोरोना,निसर्ग चक्रीवादळ आणि पाण्याचा प्रश्न या मुले नागरीक त्रस्त झाले आहेत, जर येऊ घातलेल्या सणांच्या अगोदर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर शेकाप हंडा मोर्चा काढेल, आणि अधिकाऱ्यांना या विभागात फिरकू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

ज्यांनी ज्यांनी अनाधिकृत टॅब मारले आहेत त्यांचे कनेक्शन तात्काळ तोडावेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा आक्रमक पवित्रा अनिल पाटील यांनी घेतला.तर चित्रलेखा पाटील आणि संजय पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की चर्चा करून पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. राजकारण विरहित निर्णय घेऊन सर्वाना पाणी मिळालेच पाहिजे. पिण्याच्या पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे या मध्ये राजकारण नको, पाण्याचे शेडूल्ड करा आणि सुरळीत पाणी पुरवठा करा. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेवू  त्या वेळेस योग्य तो निर्णय द्या. नाहीतर शेकाप रस्त्यावर उतरेल असा असा इशाराहीपाटील यांनी दिला. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.