Press "Enter" to skip to content

वडिलांच्या आनंदाश्रुंनी गहिवरले पनवेल शहर पोलीस स्टेशन

सिटी बेल | पनवेल |

पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन चा पदभार नुकताच स्वीकारल्या नंतर त्यांचे वडील आपल्या मुलाच्या पदोन्नती नंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी झालेल्या आपल्या मुलाचे कौतूक करण्यासाठी आले होते.त्यावेळी वडिलांनी केलेल्या कौतुकाने शहर पोलीस स्टेशन गहिवरून आले.

विजय कादबाने यांचे वडील त्रिबक कादबाणे हे शिक्षक आहेत अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले वाढळले आहेत. स्वतः प्रमाणे आपल्या ही मुलावर प्रेमळ संस्कार आणी कठोरता या दोन्ही गुणांचा प्रभाव जाणवतो. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत विजय कादमाने हे पोलीस दलात 1996 ला रुजू झाले.मुंबई नवी मुंबई सह पनवेल वाहतूक शाखा येते काम पाहिले आहे.या पदोन्नती पूर्वी ते पनवेल शहरलाच काम पाहत असल्याने त्यांना पनवेल शहराची तंतोतंत माहिती आहे.

मुळात आगामी काळात पनवेल महानगरपालिका निवडणूक,विमानतळ नामकरण यावरून होत असलेली आंदोलने,बी जे पी आणी महाविकास आघाडी यांच्यातील तणाव कमी करणे आणी पनवेल शहराच्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या भागात नागरी समाधान ही प्रमुख आव्हाने आहेत.परंतु मागील त्यांचा कामाचा आलेख पाहता आणी पनवेल शहराच्या संपूर्ण माहिती पाहता ही आव्हाने त्यांच्यासाठी नवी नाहीत.जुना अनुभव लोकांशी असणारी जवळीकता ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. जुना अनुभव त्यांच्या पाठीशी आहे .

अशा ह्या विकसित होत असणाऱ्या नवीन शहराच्या मुख्य पोलीस स्टेशनची जबाबदारी आता विजय कादबाने यांच्याकडे आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळल्या नंतर अनेक मान्यवर , पत्रकार , व्यवसाईक ,व राजकीय मंडळीनी शहर पोलीस स्टेशनचे कादबाने यांना आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यात खास बाब म्हणून आपल्या मुलाला नोकरीत बढती मिळाली म्हणून त्यांचे वडील त्रिबक कादबाने यांना ही आनंद झाल्याने त्यांनी तडक गावावरून निघत पनवेल शहर पोलीस स्टेशन गाठले .आपल्या पोलीस अधिकारी झालेल्या मुलाचा हार पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. कष्टाचे चीझ झाले असा आदर भाव वडिलांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.” लोकांची सेवा करा” असा आशीर्वाद देताच उपस्थित असणाऱ्या पोलीस स्टेशन मधील वातवरण काहीस भारावून गेले. वडिलांनी आपल्या मुलाचा असा आदरयुक्त सत्कार करावा हे भाग्य फार कमी मुलांच्या नशिबाला येते.असे आदरयुक्त वडील असतील तर नवी पिढी या घडलेल्या गोष्टींचा आदर नक्की घेईल आणी असे अनेक कर्तृत्वान अधिकारी देशसेवेत येतील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक झालेल्या मुलाच्या गळ्यात स्वागताचा हार घालताना हा क्षण पाहणाऱ्याच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या. गहिवरलेले मन ,आणी काही वेळाची शांतता काही वेळानंतर आंनदअश्रूंनी डबडबून गेली होती.

लोकांच्यासाठी यश अपयश हे नेहमी पाठशिवानी चा खेळ खेळत असते.पण यशस्वी होऊन स्वतःच्या वडिलांनी आपल्या मुलाचा हा कौतुक सोहळा करावा या पेक्षा एखाद्या मुलाला काय हवंय. आईच्या अभिननंदनासाठी आलेल्या फोन ने कादबाने यांच्या भावनांचा उर भरून आला होता.”काळजी घे लोकांची सेवा कर” हे आई चे शब्द आपण अजून ही लहानच आहोत याची प्रचिती करून गेले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.