श्रीमोरेमाऊली संप्रदायाच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळयात सर्वपक्षिय नेते अन् विविध संप्रदायांचे वारकरीही उपस्थित
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
श्रीमोरेमाऊली संप्रदायातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळयाला एकाच व्यासपिठावर सर्वपक्षिय नेत्यांची उपस्थिती लाभली असता स्वपक्षियांना काचपिचक्या देताना अन्यपक्षियांच्या नेत्यांचे कौतुकही करण्याचा प्रकार पाहून उपस्थित संतजन अवाक झाले.
महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी या दिनदर्शिकेचे प्रकाशन व लोकार्पण केले. याप्रसंगी श्रीमोरेमाऊली संप्रदायाचे गुरूवर्य आनंददादा मोरे माऊली, आजरेकर फड कोकण विभागाचे गणपत मोराणकर महाराज, ह.भ.प.रामदादा घाडगे, लक्ष्मण महाराज मालुसरे, हभप हरिश्चंद्र महाराज मोरे, रायगड शिक्षण् प्रसारक मंडळाचे चेअरमन हनुमंत जगताप, भाजपनेते मनोज भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम, अध्यक्ष अनंत पार्टे, कार्याध्यक्ष चंद्रकांत कळंबे आणि सचिव लक्ष्मण मोरे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी आ.भरत गोगावले यांनी, दरवर्षी आपल्या घराकडे 13 पायीवाऱ्यांचे आगमन होत असून भाग्यवान आमदार म्हणून नेहमीच जनतेची सेवा करण्याचे भाग्य आपणास मिळेल, असा आशावाद व्यक्त करताना श्रीसंत मोरे माऊली संप्रदायाचे काम पारमार्थिक क्षेत्रामध्ये कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, मोरे माऊली परिवाराच्या पारमार्थिक आठवणींना उजाळा दिला. पोलादपूर तालुक्यात पन्नास टक्क्यांहून अधिक वारकरी संप्रदायाची जनसंख्या असल्याने हा तालुका वारकरी तालुका असल्याचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले.








Be First to Comment