सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचा 44 वा श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहास कर्जत मध्ये सुरुवात झाली आहे.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव असल्याने अखंड हरिनाम सप्ताहास खुल्या मैदानात न घेता कर्जत मधील श्री माऊली निवास येथे घेण्यात आला आहे,काल दि.7 जानेवारी रोजी पहाटे कर्जत मधील सर्व.स्थानिक देवतांना तसेच मशिद,बोहरी मशीद या ठिकाणी स्थानिक यजमानांच्या हस्ते पूजा आणि प्रार्थना करून सप्ताहासाठी आवाहन करण्यात आले.नंतर पहाटे 4 वाजता श्री माऊलींना महाभिषेक आणि षोडशोपचारे महापूजन करण्यात आले.नंतर श्री माऊलींना श्री कपालेश्वर मंदिरात नेण्यात आले.श्री कपालेश्वर मंदिरातून श्री माऊलींना श्री माऊली निवास येथे आणण्यात आले.वनिता म्हसे यांच्या हस्ते ओवाळणी करुन आणि श्रीफळ वाढविण्यात आला. नंतर अमोल व सौ कोमल देशमुख यांच्या हस्ते सप्ताह प्रारंभ निमित्ताने विविध विधिवत महापूजन करण्यात आले.आणि श्री ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ करण्यात आला.पूजेचे पौरोहित्य नरेंद जोशी यांनी केले.
सप्ताह स्थापनेवेळी श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीचे अध्यक्ष ह.भ.प.नथुराम महाराज हरपुडे, खजिनदार संतोष वैद्य,दत्तात्रेय म्हसे,वासुदेव इंगळे, प्रभाकर केळकर,सुदाम कार्ले,रत्नप्रमा जोशी आदी उपस्थित होते.
Be First to Comment