सप्ताह सोहळ्यास खासदार सुनिल तटकरे यांची उपस्थिती
सिटी बेल | रोहा | शरद जाधव |
रोहा तालुक्यातील धाटाव किल्ला पंचक्रोशीचा 36 वा अखंड हरिनांम सप्ताह मोठ्या उस्ताहात माउलिच्या जयघोशात संपन्न झाला. शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन वेळी खासदार सुनिल तटकरे यानी आवर्जून उपस्थीती लावली.
यावेळी कार्यध्यक्ष मधुकर पाटिल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, विजयराव मोरे, सुरेश मगर, रामचंद्र सकपाल, शिवराम शिंदे, रामा म्हात्रे, सरपंच नरेश पाटिल, हेमंत कांबळे, अनिल भगत, अप्पा देशमुख, अमित मोहिते अन्य मान्यवर उपस्थीत होते .
गेली ३६ वर्ष सातत्याने हा अखंड हरिनांम सप्ताह आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे. या वर्षी यजमान वरसे ग्रामस्थ असल्याने मधुकर पाटिल, रामा म्हात्रे, सरपंच नरेश पाटिल, हेमंत कांबळे यांच्या नेतृत्वा खाली सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग सप्ताह सोहळा पार पाडण्यासाठी एकवटले होते.
यावेळी बीड, लातूर, पंढ़रपूर येथील नामवंत कीर्तन महंत यांची कीर्तने झाली. गेले 3 दिवस जनू काही पंढ़रपूर अवतरल्या चे दिसून येत होते .
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी वर्षानूवर्षाचे माऊली ने दिलेले विचार आजही तीतक्याच ताकदीने जपुन हरीनामाचा प्रसार केला जात आहे. महामारीच्या संकटात देखील हरीनामाचा जप ही खुप मोठी ताकद आहे. येणारे २०२२ साल हे भयमुक्त व कोरोना मुक्त जावो तोंडाला बांधलेली पट्टी निघुन एकमेकांचे चेहरे आनंदाने पहाता येवो तसेच बहुतांशी आमची माणसे आमच्यात रहावो व येणारे वर्ष कोरोना मुक्त होवो असे विचार सुनिल तटकरे यानी उपस्थीत जनसमुदाय समोर मांडले.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या संत वचने प्रमाणे आजच्या कलीयुगात संतांच्या विचारांची गरज असुन तेच विचार तुम्हाला संसारात तारु शकतील असे मत सप्ताह प्रसंगी मधुकर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. वरसे ग्रामस्थांनी केलेल्या नियोजनाचे उपस्थीतांनी कौतुक केले.
सप्ताह सोहळ्यात तरुणांची उपस्थीती चे प्रमुख आकर्षण
सदर सप्ताह सोहळ्यात तुळशीची माळ गळ्यात असणारे तरुण वर्गाची उपस्थीती मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. माऊलीच्या नामाचा व वारकरी सांप्रदायाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम तरुण वर्ग करित असल्याचे या सप्ताहातून दिसून आले.
Be First to Comment