कोरोना योद्धांना होणार रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप
सिटी बेल लाइव्ह / पेण(प्रशांत पोतदार)
सध्या देशात कोरोनाचे संकट सुरू असून पोलीस, डॉक्टर, पत्रकार, नगरपालिका, प्रांत व तहसील प्रशासन हे कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत.मात्र याच कोरोना योद्धांना स्वतःची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही, म्हणून त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी शनिवार दि १ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२:०० वाजता मार्कविस मंथन हॉटेल येथे वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक/अध्यक्ष व पेणचे समाजसेवक दत्ता कांबळे (डिके)यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या सि इम्युन गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी पेण पोलीस स्टेशन, वडखळ पोलीस स्टेशन, जोहे पोलीस स्टेशन, ट्रॅफिक पोलीस, पेण मधील डॉक्टर, पेण मधील सर्व पत्रकार, पेण नगरपालिका, प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय अधिकारी,कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वक्रतुंड मित्र मंडळ,पेण आणि पेण प्रेस क्लब यांच्या वतिने करण्यात आले आहे.सदर गोळ्या वाटपा वेळी वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी आणि आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






Be First to Comment