Press "Enter" to skip to content

श्री शनैश्वर मंदिरात रक्तदान शिबीर

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष राज्य रामदास तडस, कार्यध्यक्ष अशोक काका व्यवहारे, महासचिव प्रा डाॅ  भुषण कर्डिले आणि कोषाध्यक्ष गजुनाना शेलार यांच्या आदेशानुसार कोकण विभाग अध्यक्ष सतीश भालचंद्र वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील श्री शनैश्वर मंदिरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. 
 

संतश्रेष्ठ शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचे अवचित्य साधून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष डॉ सतीश भालचंद्र वैरागी यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग व जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल यांच्या वतीने श्री शनैश्वर मंदिर टपाल नाका पनवेल येथे प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ जणांनी रक्तदान केले या सर्वांना प्रमाणपत्र व आकर्षक सरप्राईज गिफ्ट देण्यात आली. 

सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्यास  गणेश धोत्रे कार्याध्यक्ष,गजानन शेलार, तुकाराम किर्वे, सुनील खळदे, मनोज खळदे,प्रिया डिंगोरकर, जयश्री वैरागी, अनिल खोंड, श्रद्धा खोंड,रवी जगनाडे, दीपू जगनाडे या पदाधिकारी व इतर समाज बांधवांच्या सहकार्याने पार पडला. या कार्यक्रमाला राजेंद्र रहाटे, कुणाल महाडिक,विठ्ठल सकपाळ,गणेश महाडिक,रविंद्र निगडे, मंगेश रसाळ,संतोष रहाटे, व इतर समाज बांधवांनी उपस्थिती लावली

ज्या समाजबांधवांनी रक्तदान केले त्या सर्वांचे व कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिलेल्याचे मी मनापासून आभार मानत असून असेच समाजकार्यात नेहमी एकत्रित काम करूया असे आव्हान कोकण विभाग अध्यक्ष डॉ.सतीश वैरागी यांनी कार्यक्रम दरम्यान उपस्थितांना केले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.