Press "Enter" to skip to content

गुड मॉर्निंग क्रिकेट टीम ची सामाजिक बांधिलकी

ओपन जिम अवजारांच्या दुरुस्तीसाठी सरसावली गुड मॉर्निंग क्रिकेट टीम

सिटी बेल | पनवेल |

पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा सिनियर क्रिकेटर सईद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ क्रिकेटपटूंची गुड मॉर्निंग क्रिकेट टीम पनवेल तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावर रोज सकाळी कसून सराव करते. याच मैदानावर कार्यान्वित केलेल्या खुल्या व्यायाम शाळेतील अवजारांची दुरुस्तीची निकड पाहता गुड मॉर्निंग क्रिकेट खेळाडूंनी पुढाकार घेऊन ती तातडीने करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट टीम ने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांच्या वर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.

गुड मॉर्निंग क्रिकेट टीमचे सदस्य विजय पाटील यांच्या सर्वप्रथम खुल्या व्यायाम शाळेतील काही अवजारे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही गोष्ट आपल्या सहकाऱ्यांच्या कडे बोलून दाखविली. गुड मॉर्निंग क्रिकेट टीमचे सहकारी तालुका क्रीडा अधिकारी मनीषा मानकर यांना जाऊन भेटले. अवजारांच्या दुरुस्ती बाबत त्यांना अवगत केले. इतकेच नव्हे तर दुरुस्ती तातडीने होणे शक्य नसल्यास किंवा त्यात काही तांत्रिक अडचणी असल्यास गुड मॉर्निंग क्रिकेट टीम स्वखर्चाने ही दुरुस्ती करून देऊ शकेल असे सांगितले.

तालुका क्रीडा अधिकारी मनीषा मानकर यांनी तातडीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून खुल्या व्यायाम शाळेतील अवजारांची दुरुस्ती घडवून आणली. मानकर यांनी तातडीने समन्वय साधत व्यायाम शाळा अवजारांची दुरुस्ती केल्याने त्यांचे देखील कौतुक होत आहे.माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, विजय पाटील, सुभाष पाटील, प्रफुल्ल फडके, सुहास देशमुख, कुणाल सावंत, संदीप पाटील, डॉक्टर राऊत, डॉक्टर वैभव पाटील, राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील या गुड मॉर्निंग क्रिकेट टीम सदस्यांनी अवजार दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला.

अन्य खुल्या व्यायाम शाळांची अवजारे ही उद्याने अथवा तत्सम ठिकाणी असल्याने त्यांच्या वापरावर आणि वापर करण्याच्या तासान वरती अंकुश आणणे शक्य असते. परंतु तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावरील ही अवजारे अगदी रस्त्यालगत आहेत. त्यामुळे त्याचा वापर करणाऱ्यांच्या संख्या वरती अंकुश आणि शक्य होत नाही, तसेच त्यांचा वापर करण्याच्या कालावधीवर देखील अंकुश आणणे शक्य होत नाही. अर्थातच जास्त वापर असल्या कारणामुळे या अवजारांची दुरुस्ती करावी लागली. गुड मॉर्निंग क्रिकेट टीमने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही तातडीने त्यांची दुरुस्ती करून घेतली.

मनीषा मानकर
तालुका क्रीडा अधिकारी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.