देश भरात ५००० स्किल हब च्या माध्यमातून ८ लाख युवकांना मिळणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण
जन शिक्षण संस्थान चा रायगडचा स्किल हब साठी पुढाकार
सिटी बेल | कर्जत |
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणाऱ्या नेरळ-कर्जत येथे जन शिक्षण संस्थान रायगड व करिअर टेकनिकल ट्रैनिंग इंस्टीट्यूट नेरळ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्किल हब साठी पुढाकार घेण्यात आला आहे. नेरळ कर्जत येथे कौशल्य विकास मंत्रालयाचे “स्किल हब” योजनेतील जिल्यातील पहिले सेंटर सुरू करण्यात आले व असिस्टंट इलेक्ट्रिशियन व फिल्ड इंजिनीअर RACW प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी नेरळ-कर्जत येथे संपन्न झाले. सदर योजनेत देश भरात ५००० “स्किल हबच्या” माध्यमातून ८ लाख युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित असतांना या कार्यक्रमाच्या शुभ प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, संचालक विजय कोकणे, अन्वया करंदीकर, सुजाता मनवे (कर्जत पंचायत समिती सभापती), संजय वर्तक (राज्य प्रतिनिधी कौशल्य विकास), सायली सुभाने (जिल्हा प्रतिनिधी कौशल्य विकास), नवीन भोपी (रोजगार समन्वयक), सौ रंजना नवीन भोपी, सौ. गणेश्री भोपी, गणेश भोपी (असिस्टंट इलेक्ट्रिशियन प्रशिक्षक) व विजय रणदिवे (फिल्ड इंजिनीअर RACW प्रशिक्षक), अविनाश डायरे व दिनेश कांबरी (ब्रँच पोस्ट मास्टर) सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी सौ. कल्पना म्हात्रे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), ओंकार बोरकर व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उदघाटन समारंभ कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.
सदर प्रशिक्षण वर्गामध्ये इलेक्ट्रिशियन व एसी, फ्रिज व वॉशिंग मशीन रिपेरिंग वर सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक गणेश भोपी व विजय रणदिवे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.








Be First to Comment