मुंबई बोर्डाकडून होणार सत्कार : रायगड मधून पहिलाच चमत्कार

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
मार्च २०२०मध्य घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेचा एस.एस.सी.निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत रोहन सुधीर हशीलकर हा विद्यार्थी ३५%गुण मिळवून उत्तीर्ण झाला असुन हा आज पर्यंत रायगड जिल्ह्यात पहिलाच चमत्कार आहे.या यशा बद्दल मुंबई बोर्डाकडून त्याचा सत्कार होणार आहे
गेली दोन महिन्यापासून सर्वांचे लक्ष लागलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल २९जुलै रोजी जाहीर झाला.यामध्ये रोहन सुधीर हशीलकर यांनी ३५% गुण संपादित करून संपूर्ण रायगड जिल्ह्यात पहिलाच चमत्कार केला आहे रोहन हशीलकर हा वि. ना. पंडित इंग्रजी माध्यम स्कूल रोहा या शाळेचा विद्यार्थी असुन त्याला मुख्यध्यापक जोशी मॅडम व कै.द.ग.तटकरे प्राचार्य श्रीराम काळे सर यांनी मार्गदर्शन केले आहे.
रोहन हशीलकर या जिनियस विद्यार्थ्यांचे मुंबई बोर्डाकडून सत्कार करण्यात येणार असुन या यशा बद्दल कै.द.ग.तटकरे कोलाडचे प्राचार्य श्रीराम काळे सर,वि.ना. पंडित स्कूलच्या मुख्यध्यापिका जोशी मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक वर्ग तसेच पत्रकार श्यामभाऊ लोखंडे,विश्वास निकम, नंदू कळमकर यांच्या कडून तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून रोहन याचे अभिनंदन करण्यात आले आहे.






Be First to Comment