Press "Enter" to skip to content

चौक येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

नेताजी पालकर मंडळातर्फे ३६१ व्या उंबरखिंड विजय दिनानिमित्ताने रायगड जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

चौक येथील नेताजी पालकर मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे चावणी येथील ३६१ व्या उंबरखिंड विजय दिनानिमित्ताने (२ फेब्रुवारी २०२२) रायगड जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.’नरवीर तानाजी मालुसरे-जीवन कार्य’ या विषयावर २००० शब्दमर्यादेपर्यंत कागदाच्या एका बाजूस स्व हस्तलिखित (चित्रांसह) लिहिण्याचा असून स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, शिक्षण,व्यवसाय, मोबाईल नंबर, लिहिलेला स्वतंत्र कागद निबंधसह जोडायचा आहे.

स्पर्धकांनी आपले निबंध २० जानेवारी २०२२ पर्यंत पोस्टाने किंवा स्वहस्ते सर्वश्री
यशवंत गोपाळ सकपाळ (रायगड भूषण) ब्राम्हण आळी,मु.पो- चौक, ता- खालापूर, जि- रायगड 410206.
मो.नं-9326153737

भूषण जयवंत पिंगळे,10 आशिर्वाद अपार्टमेंट, विठ्ठल नगर कर्जंत, ता-कर्जंत, जि-रायगड,410201,मो-9325804665

स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या पाच स्पर्धकांना रु. 750₹, 500₹, 400₹, 350₹, 250₹ ची अशी पाच बक्षिसे पुस्तक रुपात, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार , दि-२ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता विजयस्तंभ – उंबरखिंड मु.चावणी,ता- खालापूर , जि-रायगड येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना e – certificate पाठवण्यात येईल.

चौक चे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार कै.जनार्दन रामचंद्र भरातूक यांचे स्मरणार्थ श्री. अनिल जनार्दन भरातूक यांच्यातर्फे सदर स्पर्धेचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होऊन इतिहास जागृतीच्या कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन नेताजी पालकर मंडळाचे संघटक यशवंत सकपाळ यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.