माध्यमिक शाळा शिहू हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमां विषयी मार्गदर्शन
सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | शिहू |
रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल झेंडे पाटील यांच्या आदेशाने, तसेच नागोठणे पोलिस स्टेशनंचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ जानेवारी २०२२ नविन वर्षाचे औचित्य साधून को. ए. सो. माध्यमिक शाळा शिहू येथे विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमां विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी पोलिस दूरक्षेत्र वेलशेत चे पोलिस इंचार्ज प्रमोद कदम यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले कि, कोणत्याही विद्यार्थ्यांने १८ वर्षावरील वाहन चालवीण्याचा परवाना मिळाल्याशिवाय वाहन चालवू नये, तसेच श्यक्यतो डोक्यात हेल्मेट घातल्याशिवाय वाहन चालवू नये कारण कि, आपण बघतो जास्तीत जास्त अपघातांमध्ये अल्पवयिन मुलांचा समावेश असतो असे अपघात टाळायचे असतील तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. म्हणून कोणीही वाहन चालवीण्याचा परवाना मिळाल्या शिवाय वाहन चालवू नका व हेल्मेट चा नियमित वापर करा असे विद्यार्थ्यांना सूचित करण्यात आले.
यावेळी उपस्थित ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे प्रमोद कदम ( पोलिस दूरक्षेत्र वेलशेत इंचार्ज )माध्यमिक शाळा शिहू चे मुख्याध्यापक जे. जे. पाटील सर, जाधव सर, पाटील सर, उषा म्हात्रे मॅडम , जाधव मॅडम, जनार्धन शेलके, कमला ठाकूर, दळवी इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.








Be First to Comment