Press "Enter" to skip to content

लोधिवलीत श्रमदानातून वनराई बंधारा

लोधिवली गावात राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत श्रमदानातुन बांधला वनराई बंधारा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

लोधिवली गावात राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत श्रमदानातुन वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. खालापूर तालुका कृषि अधिकारी अर्चना सुळ यांच्या हस्ते सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला .

पावसाळयानंतर पाणी नाल्यांद्वारे वाहुन जाते हे पाणी अडविण्याचे प्रभावी व कमी खर्चाचे माध्यम म्हणजे वनराई बंधारा हा वनराई बंधारा बांधण्यासाठी रिकाम्या प्लॅस्टिकच्या पोती , टिकाव , घमेली आणि नालापात्रातील माती हे साहीत्य आणि गावक – यांच श्रमदानातून बांधण्यात आला आहे. वनराई बंधारामुळे लोधिवली गावातील पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण होऊन जनावरांना पिण्याचे पाणी मिळणार आहे.

लोधिवली गावातील ग्रामस्थांनी तालुका कृषि अधिकारी खालापुर यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या रिकाम्या पोती आणि शिंदे साहेब ,राठोड साहेब यांच्या तांत्रिक मार्गदर्शनुसार १० मी लांबीचा आणि १.२० मी . उंचीचा २. १० मी . रुदीचा वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे. बंधाराच्या पाण्याचा उपयोग जनावरांना, कडधान्य पिके व भाजीपाला पिके घेणा-या शेतक-यांना होणार आहे .

यासाठी बाळकृष्ण लबडे यांनी मोलाचे योगदान करुन सदर बंधारा पूर्ण करण्यासाठी बाळकृष्ण लभडे, शेतकरी संघटना अध्यक्ष सुभाष मुंढे ,माजी सरपंच संगिता पवार माजी उपसरपंच गणपत ठाकूर,माजी उपसरपंच सुभाष प्रबळकर , ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गोल्हार
पोलीस पाटील किरण पाटील ,पत्रकार एकनाथ सांगळे , सुनिल पाटील,यशवंत पाटील , नितीन भद्रीके , रुपेश लबडे , महेश लबडे , दिनेश शिदे, कमल पाटील , ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ , कृषि विभागाचे महाडीक साहेब , चौधरी साहेब यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

वनराई बंधारामुळे उपलब्ध होणारे पाणी हे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना संरक्षित सिंचन म्हणून वापरता येईल तसेच पाण्याचे स्त्रोत रिचार्ज होण्यास मदत होते . त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी श्रमदान करुन वनराई बंधारेचे काम करावे.
अर्चना सुळ , खालापूर तालुका कृषि अधिकारी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.