सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील श्रीमती लक्ष्मीबाई काशिराम वाजे यांचे वृद्धकाळाने व अल्पशा आजारामुळे निधन झाले आहे मृत्यू समयी त्या ९५ वर्षाच्या होत्या.
श्रीमती लक्ष्मीबाई या अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होत्या त्यांचे माहेर आणि सासर हे चिल्हे त्यामुळे सर्वांशीच मिळून मिसळून राहत असत गरीब कुटूंबात वावरून मुलांना उच्च शिक्षण दिले त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली ,जावई, पुतणे,सुना नातवंडे असा मोठा वाजे परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी बुधवार २९ डिसेंबर व उत्तरकार्य शनिवारी १ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या राहत्या घरी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार आहेत.








Be First to Comment