अध्यक्षपदी गणपत गवस तर उपाध्यक्षपदी मोतीभाई बागवान
सिटी बेल | पनवेल |
पनवेल पिपल्य नागरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यात अध्यक्षपदी गणपत गवस तर उपाध्यक्षपदी मोतीभाई बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पनवेल पिपल्य नागरी पतसंस्था गेली २८ वर्ष नविन पनवेल येथे कार्यरत असुन अलिकडील काळात बँकेच्या दोन शाखा स्थापन केल्या. या पतसंस्थेची सभासद संख्या जवळपास पाच हजार असुन नेहमी ऑडिट वर्ग “अ” प्राप्त राहीला आहे. बँकेच्या विश्वासार्थ १७ कोटी ठेवी आणि छोटया मोठया उद्योगाला पर्सनल आणि तारण कर्ज १२ कोटी आहेत.
ह्या संस्थेची सन २०२१ ते २०२६ काळातील पंचवार्षिक निवडणुक निवडणुक निर्णय अधिकारी बालाजी वाघमारे यांच्याअधिकारा खाली बिनविरोध पार पडली. तसेच निवडून आलेल्या संचालकांतुन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची देखिल सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. बॅकेच्या कामकाजाचे मोलाचे कार्य लाभले ते व्यवस्थापक विष्णु सखाराम गवस. ऊर्फ बाळू सर्व संचालक यांच्या वतीने सर्व ग्राहाकांचे सभासदांचे ठेवीदारांचे सेवक वर्ग यांचे आभार मानले .
यावेळी बिनविरोध निवडून आलेले सभासद खालील प्रमाणे
काळगे वसंत किसन
कुबल किशोर सदाशिव
कुंभार संजय रामजी
गवस गणपत शिवराम
घाडी सोमा अर्जुन
चौधरी लालजी सरजू
बागवान मोतीलाल दादामिया
गायकवाड दत्तात्रय दशरथ
गवस अर्चना आप्पा
साखरे अर्चना अनिल








Be First to Comment